युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

सेप्टैंबर भिवंडी (प्रतिनीधी): तालुक्यातील तिर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी येथे एका युवकाने रात्री लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विजय आचार्य (२२, मालाड) असे या युवकाचे नाव आहे. सकाळी लॉजमालकाने सदर युवक रुम उघडत नसल्याने खिडकीतून डोकावले असता सदर घटना उघडकीस आली. विजयने खूप प्रमाणात मद्यपान करुन नंतर गळफास घेतल्याचे समोर आले. या प्रकरणी गणेशपुरी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे...