कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सरसावले आहेत. अशातच सारा अली खानसोबतच करिना, सैफ अली खाननेही मदतीचा हात देऊ केला आहे.
मुंबई : सारा अली खान, करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदतीचा हात दिला आहे. देशात दिवसेंदिवस कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. तसेच 14 एप्रिलपर्यंत घोषित झालेल्या लॉकडाऊननंतर देशात मोठी आर्थिक मंदी येण्याचा धोका आहे. याशिवाय सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त मदतनिधीची गरज आहे.
टॉलिवूड, मराठी सिनेसृष्टी आणि बॉलिवूडची कलाकार मंडळी देखील पंतप्रधान केअर फंडमध्ये डोनेशन करत आहेत. आता यात सारा अली खान, करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचाही समावेश झाला आहे. करिना कपूर खानने इंस्टाग्रामवर याबसंदर्भात पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
'संकटाच्या या काळात आपण सर्वांनी पुढे येऊन मदत करणं आवश्यक आहे. आम्ही दोघांनी यूनिसेफ, गिव्ह इंडिया आणि द इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन वॅल्यूजला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण सर्व एकत्र पुढे जाऊ. जय हिंद.' अशी पोस्ट करिना कपूरनं केली आहे. या पोस्टखाली तिनं करीना, सैफ आणि तैमुर अशी नावं दिली आहेत.