कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हवेची गुणवत्ता सुधारल्याचं जगभरात पाहायला मिळत आहे. निरभ्र आकाश, आवाज कमी पातळी, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हलकी हवा हा प्रदूषण कमी झाल्याचा दाखला आहे.
नागपूर (प्रतिनिधी) : कोरोना व्हायरसमुळे भारतासह जगभरातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे सामान्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला असला तरी वातावरणात मात्र सकारात्मक बदल झाला आहे. महाराष्ट्राच्या मोठ्या आणि प्रदूषित शहरांच्या हवेची गुणवत्ता सुधारल्याचं चित्र आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, चंद्रपूर, सोलापूर आणि नागपूर या शहरांमधील नागरिक सध्या स्वच्छ आणि शुद्ध हवेतून श्वासोच्छवास घेत आहेत. य ज्या आणि प्रदूष
हवा बदलात पुणे आणि ठाण्याने पहिलं स्थान पटकावलं आहे. या शहरांची हवा मध्यमवरुन उत्तम झाली आहे. तर ऐरोली हा एकमेव ठिकाण आहे, ज्याची हवा उत्तमवरुन समाधानकारक झाली आहे.
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हवेची गुणवत्ता सुधारल्याचं जगभरात पाहायला मिळत आहे. निरभ्र आकाश, आवाज कमी पातळी, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हलकी हवा हा प्रदूषण कमी झाल्याचा दाखला आहे. महाराष्ट्राच्या शहरांचे प्रदूषण नक्की किती कमी झाले हे समजावं म्हणून काल (1 एप्रिल) संध्याकाळच्या हवेची स्थिती आणि बरोबर एक महिन्यापूर्वी त्याच वेळी काय स्थिती होती याची तुलना केली.
त्याचा परिणाम असा
शहर 1 एप्रिल संध्याकाळची हवा एक महिना आधीची हवा गुणवत्ता
चंद्रपूर 62 93 समाधानकारक
मुंबई कुलाबा 69 100 समाधानकारक
मुंबई सांताक्रूझ 54 149 समाधानकारक
नागपूर 71 73 समाधानकारक
नाशिक 67 87 समाधानकारक
नवी मुंबई, नेरुळ 101 47 मध्यम
ऐरोली 101 94 समाधानकारक
पुणे 49 100 उत्तम
सोलापूर 61 80 समाधानकारक
ठाणे 41 110 उत्तम
प्रदूषण नियंत्रण बोर्डाने केलेले हे मानांकन हे मनुष्याच्या श्वसनप्रक्रियेच्या सरलतेशी जुळले आहे. जेव्हा हवेची गुणवत्ता ही मध्यम असते तेव्हा फुफ्फुस, अस्थमा आणि हृदयविकार असणाऱ्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. जेव्हा हवेची गुणवत्ता समाधानकारक असते, तेव्हा अत्यंत संवेदनशील लोकांना श्वास घेण्यास थोडासा त्रास होऊ शकतो. मात्र हवेची गुणवत्ता उत्तम असली तर असा कुठला ही त्रास उद्भवत नाही. त्यामुळे लॉकडाऊन मागे घेतली तर हवेची गुणवत्ता पूर्वीप्रमाणेच होऊ नये याचा सगळ्यांनीच विचार करायला हवा.