वडूज , खटाव (चाँद सय्यद) : गेल्या काही दिवसांपूर्वी वडूज मधील एक कुटुंब दिल्ली निजामुद्दीन येथे मसकस कार्यक्रमात सहभागी झाल्याच्या कारणावरून तुम्हाला कोरोना झाला आहे, तुमच्याकडे कोणी येणार नहीं, तुम्ही येथे राहु नका...आदि प्रश्न अनेक जणांनी फोनवर अनेकदा विचारल्यामुळे गेले काही दिवस हे कुटुंब हे फार तनवात राहत असून आज त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली असता या कुटुंबातील आणि संपूर्ण खटाव तालुक्यातील कोणीही कोरोनाबधित नसून विनाकारण अफवा पसरून त्रास देणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वडूज पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक पाटिल यांनी सांगितले आहे.
अफवा नको, अन्यथा करवाई करण्यात येईल- निरीक्षक अशोक पाटिल